जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या अडीअडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एकत्रित बैठक
यावेळी बोलताना सामंत यांनी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना भरपाई मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह एकत्रित बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीला सहकारमंत्र्यांनाही निमंत्रित केले जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
Uday Samant, Ratnagiri, Farmers Loan, CIBIL Score, Bank Officials, Criminal Charges, Mango Growers, Unseasonal Rains, Compensation, Ajit Pawar
#UdaySamant #Ratnagiri #FarmersRights #CIBILScore #BankLoans #AgriculturalLoans #MangoGrowers #CropLoss #MaharashtraGovernment #AjitPawar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: