मंगळवार, ३ जून, २०२५

शिवसेनेचा पर्यावरणपूरक उपक्रम: कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

 


खारघर: "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने जपत, शिवसेनेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक बंदीला पाठिंबा दर्शवत एक समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, शिवसेना दुकानदार आणि नागरिकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करणार आहे. 

 शिवसेना महानगर संघटक  मंगेश रानवडे, खारघर शहर संघटक  इम्तियाज शेख, विभाग प्रमुख  मुनाफ अमिराली आणि महिला संघटिका सौ. ज्योती नाडकर्णी यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले आहे. या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून शिवसेना आता प्रत्येक घराघरात आणि किचनमध्ये पोहोचणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.   

या कापडी पिशव्यांचे अनावरण २ जून, २०२५ रोजी खारघर येथील लिटल मॉल येथे एका समारंभात झाले. या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी व उत्पादन मंत्री  भरत गोगावले, खासदार  श्रीरंग  बारणे, संपर्क प्रमुख  राजेंद्र यादव, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख  प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख सचिन मोरे, तालुका संघटिका मंदा जंगळे, खारघर शहर संघटक इम्तियाज शेख यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.    

"पर्यावरण वाचवा, प्लास्टिक टाळा" हा संदेश घेऊन शिवसेना आता घरोघरी पोहोचणार आहे.    

-----------------------------------------------------------------------------------------------------

#Shivsena #Environment #PlasticBan #ClothBags #SocialWork #Kharghar #Maharashtra #MarathiNews #शिवसेना #पर्यावरण #प्लास्टिकबंदी #कापडीपिशव्या #समाजकारण #महाराष्ट्र #बातमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा