भाजपा प्रदेश कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन; योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित

 


 प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, मोहन बने यांच्यासह कार्यालयीन पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पुणे, २१ जून २०२५: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) प्रदेश कार्यालयात आज (शनिवार, २१ जून) एका विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात योगसाधनेचे महत्त्व विषद करत विविध योगाभ्यास करवून घेण्यात आला.

भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश योगप्रमुख योगीराज भारत भूषण यांनी या शिबिराचे मार्गदर्शन केले. त्यांनी योगाचे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले फायदे सविस्तरपणे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला.

या कार्यक्रमात प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, मोहन बने, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सह सचिव भरत राऊत यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरामुळे पक्ष कार्यालयात निरोगी आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली, तसेच उपस्थित सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व पुन्हा एकदा पटले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

BJP, International Yoga Day, State Office, Yoga Camp, Yogiraj Bharat Bhushan, Atul Shah, Mohan Bane, Mukund Kulkarni, Bharat Raut, Spiritual Coordination Front, Yoga Practice, Health, Wellness. 

#YogaDay2025 #InternationalYogaDay #BJP #YogaCamp #Pune #HealthAndWellness #YogirajBharatBhushan   

भाजपा प्रदेश कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन; योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित  भाजपा प्रदेश कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन; योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित Reviewed by ANN news network on ६/२१/२०२५ ०६:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".