पुणे: विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी सकाळी ०५:३० वाजण्याच्या सुमारास शितल बिअर शॉपी दुकानासमोरच्या जागेत, पुणे येथे एका अनोळखी पुरुषाचा (वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे) मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून या पुरुषाला कोणत्यातरी शस्त्राने डोक्यावर, तोंडावर तसेच गळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार पुढील तपास करत आहेत.
- ---------------------------------------------------------------------------------------------------------------- #Murder, #PuneCrime, #Homicide, #VishrambaugPolice
पुणे शहरात अज्ञात व्यक्तीचा खून; शितल बिअर शॉपीसमोर मृतदेह आढळला
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०५:३५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०५:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: