पुणे, दि. ४ जून: "माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ का केलीस?" असा जाब विचारत एका २७ वर्षीय तरुणाला, त्याच्या भावाला आणि बहिणीला तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, लोखंडी हत्यार उगारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोंढव्यात घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आरोपींना अटक
या हल्ल्यानंतर फिर्यादीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १) आवेज इलियाज शेख (वय २३), २) अरमान इलियाज शेख (वय १९, दोघेही रा. मिठाणनगर, गल्ली नं ५, निलेश कॉम्प्लेक्स बिल्डिंग, कोंढवा खुर्द) आणि ३) आसीफ हिदायत शेख (वय २४, रा. फैजाने मदिना मशीद जवळ, कोंढवा) या तिघांना अटक केली आहे.
काय आहे घटना?
ही घटना २ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील नवाजीश पार्क, बीएस गल्ली येथे घडली. फिर्यादी तरुण घरी असताना आरोपी त्याच्या घरी आले. "तू माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ का केलीस?" असे म्हणून आरोपींनी फिर्यादी, त्याचा भाऊ आणि बहीण यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने लोखंडी हत्यार काढून फिर्यादीला मारण्यासाठी उगारले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
आई-वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला, तिघांना अटक
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०४:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: