पुणे: लोहगाव येथील लक्झरी स्टार युनिसेक्स सलून शॉपमधून अज्ञात चोरट्याने १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने (वय २८ वर्षे, रा. लोहगाव, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपी अज्ञात असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. ०६/०६/२०२५ रोजी रात्री १२:०० वाजल्यापासून ते दि. ०७/०६/२०२५ रोजी सकाळी ०८:०० वाजण्याच्या दरम्यान लक्झरी स्टार युनिसेक्स सलून शॉप, आदित्य बिल्डींग, लोहगाव, पुणे येथे ही चोरी झाली. फिर्यादींच्या सलून दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटून आत प्रवेश केला आणि ड्रावरमध्ये ठेवलेली १,५०,०००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी विमानतळ स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २६२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (चोरी), ३३१ (३) (चोरी), ३३१ (४) (चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक निरीक्षक चंदन करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------#ShopTheft, #LohgaonCrime, #Theft, #PunePolice, #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/०८/२०२५ ०३:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: