अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास

 


जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी दोषी

ठाणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे यांनी आरोपी आकाश मारूती हटकर (वय २८) याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास, त्याला एक वर्ष साधा कारावास भोगावा लागेल. 

माहे जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान रायगड गल्ली, पाचपाखाडी, ठाणे येथे ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी आकाश मारूती हटकर याने अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. इतकेच नाही, तर आरोपीने त्याची आई रेखा मारूती हटकर (वय ४८) हिच्यासोबत मुलीला उल्हासनगर येथील डॉक्टरकडे नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. "गर्भपात कर, नाहीतर तुझी बदनामी करू," अशी धमकी देऊन त्यांनी मुलीला गर्भपातासाठी प्रवृत्त केले.

या गंभीर प्रकाराबाबत अल्पवयीन मुलीने नौपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५५/२०१७, भारतीय दंड संहिता कायदा कलम ३७६ (F) (H) (I) (N), ५०६ (२) सह पॉक्सो (Protection of Children from Sexual Offences) कायदा कलम ३, ४, ५, ६ नुसार आरोपी आकाश मारूती हटकर (वय २८) आणि रेखा मारूती हटकर (वय ४७) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन तपास अधिकारी  प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपींविरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या गुन्ह्याची सुनावणी  जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे यांनी घेतली.

आरोपी आकाश मारूती हटकर यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवण्यात आले, तर आरोपी क्रमांक २, रेखा मारूती हटकर हिला फौजदारी प्रक्रिया संहिता २३५ (१) अन्वये या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

या बलात्काराच्या गुन्ह्याच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या  रेखा हिवराळे, म्हात्रे, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, तत्कालीन तपास अधिकारी निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक प्रशांत लोंढे, सपोउपनि बोराडे, कोर्ट पोहवा राठोड, लोहार, पोहवा म्हामुनकर, वीर, पोशि सिंग यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. त्यामुळे आरोपीला दोषी ठरवण्यात यश आले.

Rape Conviction, Minor Victim, POCSO Act, Thane Police, Court Verdict, Justice Served. 

 #ThanePolice #RapeCase #POCSOAct #CourtVerdict #Justice #CrimeNews

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ ११:२१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".