हडपसर-मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला अटक, पिस्तूल जप्त

 

पुणे, दि. 4 जून: हडपसर आणि मांजरी परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून, पिस्तूल आणि लोखंडी हत्यारांनी दहशत माजवणाऱ्या आणि गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

काय आहे घटना?
दिनांक २९ मे २०२५ रोजी मांजरी बुद्रुक येथील गागू एंटरप्रायजेस समोर सुमित उर्फ विलास दत्ता खवळे (वय २०), वैभव श्रावण गवळी (वय २२) आणि इतर चार अनोळखी साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवला होता. त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे लोखंडी हत्यार आणि पिस्तूल होते. यावेळी आरोपी सुमित खवळे याने फिर्यादीच्या मुलाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपी वैभव गवळी हा लोखंडी हत्यार घेऊन फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे लागला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांची कारवाई आणि अटक
याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु.र.नं ५०९/२०२५) भारतीय न्याय संहिता कलम १०९, १८९(२),(४), १९०, १९१(२)(३), आर्म्स ॲक्ट कलम ३(२५), ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हडपसर पोलिसांनी तातडीने दोन तपास पथके तयार केली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १) सुमित उर्फ विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सासवड रोड, सातववाडी, हडपसर), २) साहिल बाबूराव जगताप (वय २०, रा. घवाटे वस्ती, मांजरी), ३) बसवराज विजय सुतार (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा), आणि ४) वैभव श्रावण गवळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यासाठी लागणारे पिस्तूल हे शिरापूर येथील एका इसमाकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार तपास पथकाने शिरापूर येथे जाऊन ५) सचिन गंगाराम रेणके (वय ३५, रा. शिरापूर) यालाही ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कामगिरी अपर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उप आयुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त (हडपसर विभाग) अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ  निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी  उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------
 #PuneCrime #HadapsarPolice #ManjariFiring #AttemptedMurder #PunePoliceAction #IllegalFirearm #Arrested #CrimeReport #PuneNews
हडपसर-मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला अटक, पिस्तूल जप्त हडपसर-मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला अटक, पिस्तूल जप्त Reviewed by ANN news network on ६/०४/२०२५ १२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".