बैठकीत पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील राडारोड्याचे व्यवस्थापन आणि पाणी सोडल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
जैवविविधता संवर्धन क्षेत्र (BDP) आणि वाहतूक कोंडीवर चर्चा
जैवविविधता संवर्धन क्षेत्र (BDP) वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी माहिती दिली. तसेच, पावसाळ्यात शहरातील ठिकठिकाणी साचणारे पाणी व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतही विस्तृत चर्चा झाली.
नाट्यगृहांची दुरुस्ती आणि 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेच्या अंमलबजावणीचे आदेश
पुणे महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराची दखल घेत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश उपआयुक्त सांस्कृतिक विभाग सुनील बल्लाळ यांना देण्यात आले. महापालिकेच्या अखत्यारितील सर्व नाट्यगृहांची दुरवस्था आणि दुरुस्तीबाबतही माहिती घेण्यात आली.
बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त एम.जे.प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख नीना बोराडे, मुख्य अभियंता पथ विभाग अनिरुद्ध पावसकर, देखभाल दुरुस्ती मुख्य अभियंता जगदीश खानोरे, अधीक्षक अभियंता (मलनिःसारण) संतोष तांदळे, उपआयुक्त अतिक्रमण संदीप खलाटे, उपआयुक्त सांस्कृतिक विभाग सुनील बल्लाळ, आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- Pune, Maharashtra, Urban Issues, Environmental Issues, Disaster Management, Monsoon Preparedness, Traffic Congestion, Public Health, Municipal Corporation, Dr. Neelam Gorhe, Government Meeting
- #Pune #PMC #MonsoonPreparedness #EnvironmentalIssues #DisasterManagement #DrNeelamGorhe #UrbanPlanning #MaharashtraPolitics #PublicHealth #BalasahebThackerayAaplaDavakhana

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: