शैक्षणिक संकुलाला टाळे आणि पोलिसांचा बंदोबस्त
घटनेनंतर तातडीने 'उमाकिरण' शैक्षणिक संकुलाला टाळे ठोकण्यात आले आहे. क्लासेसच्या परिसरात सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलन आणि आरोप
सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आरोपीला पळून जाण्यासाठी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी मदत केल्याचा गंभीर आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार आहे.
Beed, Student Molestation, UmaKiran Educational Complex, Protest, Police Deployment, Shivaji Nagar Police Station, Sandeep Kshirsagar Allegations, Law and Order, Student Safety, Social Activism
#Beed #StudentSafety #Molestation #Protest #UmaKiranComplex #PoliceAction #SandeepKshirsagar #JusticeForStudents #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: