पुणे: पुणे शहरातील मार्केट यार्ड वाहतूक विभागात वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेल (शश्रृंजय मंदिर) ते गंगाधाम चौक आणि टिळेकर चौक कोंढवा ते गंगाधाम चौक या दोन प्रमुख रस्त्यांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना २४ तास प्रवेश मनाई करण्यात आली आहे. तसेच, लुल्लानगर कोंढवा ते गंगाधाम चौक चंद्रलोक हॉस्पिटल चौक आणि गंगाधाम चौक ते वखारमहामंडळ चौक सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर सकाळी ०६:०० ते रात्री २३:०० या वेळेत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी १२ जून २०२५ रोजी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर- ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश दिले आहेत.
नवीन नियमावली:
- कात्रज कोंढवा रोड (कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक) आणि टिळेकर चौक कोंढवा ते गंगाधाम चौक: या मार्गांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना वाहतुकीसाठी २४ तास प्रवेश मनाई.
- लुल्लानगर कोंढवा ते गंगाधाम चौक चंद्रलोक हॉस्पिटल चौक आणि गंगाधाम चौक ते वखारमहामंडळ चौक सेव्हन लव्हज चौक: या मार्गांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी ०६:०० ते रात्री २३:०० (रात्री ११ वाजेपर्यंत) या वेळेत प्रवेश मनाई. रात्री २३:०० ते सकाळी ०६:०० या वेळेत वाहतुकीस मुभा राहील.
हे आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) लागू नाहीत. या प्रेस नोटची प्रसिद्धी सर्व वर्तमानपत्रांमध्ये करावी आणि पुणे वाहतूक पोलीस वेबसाइट व सोशल मीडियावर (फेसबुक/ट्विटर) अपलोड करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधित दुकानदार, प्रतिष्ठित आणि स्थानिक नागरिकांना तात्काळ या प्रेस नोटच्या प्रती देऊन त्यांची स्वाक्षरी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
- ----------------------------------------------------------------------------------------------------------------Traffic Regulation, Heavy Vehicle Ban, Pune, Gangadham Chowk, Marketyard, Traffic Police
- #PuneTraffic, #HeavyVehicleBan, #GangadhamChowk, #Marketyard, #TrafficPolice, #PuneNews
Reviewed by ANN news network
on
६/१३/२०२५ १०:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: