५ ते ८ जून दरम्यान रंगणार राष्ट्रीय बीच कबड्डीचा थरार
खेड/रत्नागिरी: आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम येथे ५ ते ८ जून दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी खेड तालुक्यातील भरणे येथील अनिकेत स्पोर्ट्स क्लबची प्रतिभावान खेळाडू समरीन बुरोंडकर हिची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि विशेषतः खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाचे कसून सराव शिबिर सध्या अलिबाग येथे सुरू आहे. या शिबिरात समरीन आपल्या संघासह स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. तिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समरीन बुरोंडकर हिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबुशेठ तांबे, उपाध्यक्ष सतीश चिकणे, मंगेश मोरे, उमेश सकपाळ, संतोष दामुष्टे, नेत्रा राजशिर्के, जिल्हा सचिव नितीन बांद्रे, खजिनदार अभिजीत सप्रे, भाऊ पवार, पंचमंडळ प्रमुख सुधीर सावंत, सागर मोरे, सौ. संपदा गुजराती, तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सुभाष आंबडे, सचिव रवींद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील कबड्डी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समरीनला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
#SamreenBurondkar #BeachKabaddi #MaharashtraKabaddi #NationalKabaddi #TeamCaptain #Khed #RatnagiriSports #WomenInSports #Kabaddi #AniketSportsClub #Machilipatnam #MaharashtraSports
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०८:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: