राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

 


२५ जून रोजी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), २३ जून २०२५: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड येथे "भव्य रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा मेळावा सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडेल.   

रागा हॉटेल पिंपरी येथे आज (दि.२३) झालेल्या पत्रकार परिषदेत रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस सिद्धी आंगणे, महेश महाले, मनसे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष  सचिन चिखले व इतर मनसेचे  नेते, पदाधिकारी, आयोजक आदी उपस्थित होते. 

मेळाव्याचे उद्घाटन आणि उपस्थिती: 

या मेळाव्याचे उद्घाटन मनसे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष  अमित  ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्यास मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, अॅड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेडगे, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, अजय शिंदे, प्रवक्ता योगेश खैरे, तसेच पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबरर आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.   

या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे विशेष सहकार्य लाभले असून, पुणे व पिंपरी-चिंचवड येथील नामांकित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत.

उपलब्ध संधी आणि नोंदणी: 

या मेळाव्यात ५० नामवंत कंपन्या सहभागी होणार असून, २००० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. सहभागी कंपन्यांमध्ये Samsonite, Volkswagen, Spark Minda, Mahindra, Tata Group, ITC, यशस्वी ग्रुप, युवा शक्ती, डेक्कन एज्युकेशन, सायबर सक्सेस यांचा समावेश आहे. कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून आपला बायोडाटा अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष महेश महाले यांनी पत्रकार परिषदेत केले.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे स्वागत करून या माध्यमातून साहेबांचे स्वप्न साकार होईल अशा भावना व्यक्त केल्या. राज्य अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी सर्व बेरोजगार तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस सिद्धी आंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सर्व पदाधिकारी, तसेच पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभत असल्याची माहिती बैसाणे यांनी दिली.

 Raj Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, Job Fair, Self-Employment, Pimpri-Chinchwad, Ankushrao Landge Auditorium, Bhosari, Mahendra Baisane, Amit Thackeray, Skill Development, Companies, Job Opportunities, Free Event, QR Code Registration. 

 #MNS #RajThackeray #JobFair #PimpriChinchwad #Employment #SelfEmployment #Maharashtra #JobOpportunities #AmitThackeray   

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार मेळावा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार मेळावा Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ ०६:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".