माजी स्थायी समिती अध्यक्ष सुमन पवळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
निगडी गावठाण, १९ जून २०२५: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे गुरुवार, १९ जून २०२५ रोजी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन केले.
या समाजोपयोगी उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचे अध्यक्ष ॲड. रमेश उंबरगे, संस्थापक अध्यक्ष मनोहर दिवाण, तसेच महालिंग शेट्टी, शिवाजी शिर्के, राम सपाटे, रोहिदास वालगुडे, गौरी उत्तुरे, महेश स्वामी, ओंकार पवळे, नंदाराम भागवत, नंदकिशोर जगदाळे, मधुराज पवळे, साहित्यिक प्रकाश चव्हाण, राजेंद्र घावटे, अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. प्राची इंगवले, डॉ. सौरभ शिराळकर, आणि डॉ. अभिनंदन कुमठेकर यांनी वारकऱ्यांची कसून आरोग्य तपासणी केली. विशेष म्हणजे, कुमार हेरंब कुमठेकर याने उत्साहाने औषध वाटप केले. सौ. सुप्रिया कुमठेकर, प्रकाश गावडे, ओंकार पोळे, बाळासाहेब गाडे, भीमाशंकर उमरजे, दत्तात्रय दुवा, विजय नाटक, भरत मांडेकर, आणि शिवाजी पवार यांनी या उपक्रमाला सक्रिय सहकार्य केले.
या शिबिरामुळे हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे वारी परंपरेतील सामूहिकता आणि परस्परांची काळजी घेण्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे दिसून आले.
---------------------------------------------------------------------------------------------------
Nigdi Gaothan, Pimpri-Chinchwad, Ashadhi Wari, Warkari, Free Health Camp, Medical Checkup, Medicine Distribution, Police Mitra Nagarik Dakshata Sangh, Suman Pavle, Community Service
#Nigdi #PimpriChinchwad #AshadhiWari #Warkari #HealthCamp #CommunityService #PoliceMitra #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: