वाघोलीत भरधाव ट्रकच्या धडकेने कारचालकाचा मृत्यू; चालक फरार

 


पुणे: वाघोली येथील गाडेवस्ती चौकात भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने कारला धडक दिल्याने कारचालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी फिर्यादी अनिरूद्ध पाटील (वय २८ वर्षे, रा. यशोदा सुप्रीम, आळंदी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी अज्ञात ट्रक चालक अद्याप फरार आहे.

दि. ०७/०६/२०२५ रोजी पहाटे ०४:०० वाजण्याच्या सुमारास स.नं. ३६५, गाडेवस्ती चौक, वाघोली येथे हा अपघात घडला. फिर्यादीचा भाऊ युवराज चंद्रकांत पाटील (वय ३७ वर्षे, रा. यशोदा सुप्रीम, ढढळगाव, आळंदी, पुणे) हा त्याची कार घेऊन जात असताना, अज्ञात ट्रक चालकाने आपले वाहन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवले. मेनरोडवर अचानक वळल्याने फिर्यादीच्या भावाची कार ट्रकच्या मध्यभागी धडकली.

या धडकेमुळे युवराज पाटील गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघात घडवून ट्रकचालक घटनास्थळी न थांबता, अपघाताची खबर न देता पळून गेला.

या प्रकरणी वाघोली स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २३७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१ (सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवणे), १०६ (१) (अपघाती मृत्यू), आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ (रॅश ड्रायव्हिंग), १३२ (१) (थांबून माहिती न देणे), १३४ (अपघात झाल्यावर मदत न करणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उपनिरीक्षक मनोज बागल  करत आहेत.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------------- Accident, Fatal Accident, Hit and Run, Wagholi, Pune, Road Safety
  •  #FatalAccident, #HitAndRun, #Wagholi, #PuneAccident, #RoadSafety
वाघोलीत भरधाव ट्रकच्या धडकेने कारचालकाचा मृत्यू; चालक फरार वाघोलीत भरधाव ट्रकच्या धडकेने कारचालकाचा मृत्यू; चालक फरार Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०३:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".