महापालिका निवडणुकीच्या तयारीचे निर्देश
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो युवा आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी या सर्वांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना महिला नेत्या सुलभा उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, दिलीप पांढरकर, शहरप्रमुख निलेश तरस, पिंपरी-चिंचवड युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका सरिता साने, युवतीसेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका विमल जगताप, संतोष सौंदनकर, अंकुश कोळेकर, दिलीप कुसाळकर, कानिफनाथ तोडकर, प्रदीप दळवी, स्वरूपा खापेकर, शारदा वाघमोडे आणि इतर अनेक कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा संघटक सुदर्शन देसले, शहर संघटिका शिला भोंडवे आणि रमेश विश्वकर्मा यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा यशस्वी झाला. यावेळी सुरेश विश्वकर्मा, राजेश विश्वकर्मा, आदित्य यादव, भाविक गोडसे, अभिषेक गुप्ता, अंकुश यादव, प्रीतीताई भुजबळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील झाले.
राज्यभरात वाढता पक्षप्रवेश:
सध्या राज्यभरात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्याचप्रमाणे, पिंपरी-चिंचवड शहरातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.
युवा सेनेच्या माध्यमातून संघटना मजबूत:
पिंपरी-चिंचवड शहरात युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेने संघटना वाढीवर विशेष भर दिला आहे. युवा सेनेच्या माध्यमातून संघटना मजबूत होत असून, विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. घरोघरी जाऊन संघटन वाढवले जात असून, शिवसेनेच्या सभासद नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांचे मार्गदर्शन:
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने संघटनेची ताकद वाढत आहे. "नवे कार्यकर्ते आल्याने जुन्या, निष्ठावान आणि संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले.
आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवली जाईल असे सांगत बारणे यांनी, "महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, त्याची वाट न पाहता शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी झपाटून कामाला लागावे," असे आवाहन केले. या निवडणुकीत नवे, जुने आणि युवा कार्यकर्ते यांचा समतोल साधून उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shivsena, Political Entry, Pimpri Chinchwad, MP Shrirang Barne, Eknath Shinde, Municipal Elections, Youth Wing, Women Empowerment
#Shivsena #PimpriChinchwad #ShrirangBarne #EknathShinde #PartyEntry #MunicipalElections #MaharashtraPolitics #YouthInPolitics #WomenInPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: