अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्याचे जागतिक पटलावर पडसाद; संयुक्त राष्ट्रांकडून तीव्र चिंता व्यक्त (VIDEO)



नवी दिल्ली, २२ जून २०२५: अमेरिकेने इराणविरुद्ध केलेल्या हवाई हल्ल्याचे जागतिक पटलावर तीव्र पडसाद उमटले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, अमेरिकेने केलेला बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचे म्हटले आहे.

गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना तणाव कमी करण्याचं, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या, संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या इतर नियमांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढत असून, त्याचे नागरिकांसाठी, त्या प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारक परिणाम होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई हा उपाय नाही, तर मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शांतता हीच एकमेव आशा आहे, असे गुटेरेस यांनी स्पष्ट केले.

इतर देशांच्या प्रतिक्रिया: इराणचा अणुकार्यक्रम जागतिक शांततेसाठी धोका होता, आतातरी इराणने वाटाघाटीसाठी तयार व्हावे, अशी प्रतिक्रिया ब्रिटन आणि युरोपियन युनियनने दिली आहे. तर, रशियाने अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशिया दौऱ्यावर जाणार असून, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती देणार आहेत.

सौदी अरेबिया, कतार आणि इराक यांसारख्या आखाती देशांनीही या घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यामुळे या प्रदेशातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला असून, तातडीने युद्ध थांबवले जायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, अणुकार्यक्रमा संदर्भात अमेरिका-इराण यांच्यात मध्यस्थी करणारा आखातातला महत्वाचा देश ओमान याने अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. या घडामोडींमुळे जागतिक राजकारणात नवा तणाव निर्माण झाला आहे.

US Airstrike, Iran, Global Repercussions, UN Secretary-General Antonio Guterres, International Peace, Security, Diplomacy, De-escalation, Britain, European Union, Russia, Sayyed Abbas Araghchi, Saudi Arabia, Qatar, Iraq, Oman, Middle East Conflict, Nuclear Program. 

 #Iran #US #Airstrike #GlobalConcerns #UN #Diplomacy #MiddleEast #Geopolitics #InternationalRelations #Peace

अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्याचे जागतिक पटलावर पडसाद; संयुक्त राष्ट्रांकडून तीव्र चिंता व्यक्त (VIDEO) अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्याचे जागतिक पटलावर पडसाद; संयुक्त राष्ट्रांकडून तीव्र चिंता व्यक्त  (VIDEO) Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ १२:१६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".