शेअर मार्केट शिकवण्याच्या बहाण्याने महिलेची १३ लाखांची फसवणूक

 


पुणे, दि. ४ जून: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी हे शिकवण्याच्या बहाण्याने एका ४४ वर्षीय महिलेची तब्बल १३ लाख १९ हजार २१० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक आणि लिंक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
एप्रिल २०२४ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी महिलेला एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला आणि शेअर मार्केट शिकवतो असे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर (DBS) मध्ये फिर्यादीच्या नावे ऑनलाइन बँक खाते उघडले. मात्र, या बँक खात्याला आरोपीने स्वतःचा मोबाईल नंबर लिंक केला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला वेळोवेळी या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. तसेच, फिर्यादीला गोल्ड लोन घेण्यासही प्रवृत्त केले. अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण १३ लाख १९ हजार २१० रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पुढील तपास सुरू
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

शेअर मार्केट शिकवण्याच्या बहाण्याने महिलेची १३ लाखांची फसवणूक शेअर मार्केट शिकवण्याच्या बहाण्याने महिलेची १३ लाखांची फसवणूक Reviewed by ANN news network on ६/०४/२०२५ ०४:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".