रहाटणी येथे ऑनलाईन फसवणूक; 32 लाख रुपये गमावले

 


पुणे  - रहाटणी येथे एका 76 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली असून त्यांनी 32 लाख रुपये गमावले आहेत. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ७६ वर्षे, गृहिणी) यांना अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. आरोपीने कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला घाबरवून त्यांच्या खात्यातून 32 लाख रुपये त्यांच्या दुसऱ्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे त्यांची 32 लाख रुपयांची फसवणूक झाली.    

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बहीरट तपास करत आहेत.    

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #CyberCrime #Pune #OnlineFraud #FinancialFraud #SeniorCitizenFraud

रहाटणी येथे ऑनलाईन फसवणूक; 32 लाख रुपये गमावले रहाटणी येथे ऑनलाईन फसवणूक; 32 लाख रुपये गमावले Reviewed by ANN news network on ६/०४/२०२५ ०७:१२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".