गुरुवार, २९ मे, २०२५

दिघीत १३ हजार रुपयांचा गांजा जप्त: एकाला अटक


दिघी:
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ मे २०२५ रोजी रात्री ८:४५ वाजता इंद्रायणीनगर, इंद्रायणी नदी परिसरात अमली पदार्थ विरोधी महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी स्वामी भागवत माने (वय २३ वर्षे) याला अटक करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.

पोलीस हवालदार योगेश जालिंदर नागरगोजे (ब.नं. १२५०, दिघी पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी स्वामी माने कु-हाडे मळा, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे येथील रहिवासी असून, मूळचा केडगाव, ता. जि. अहमदनगर येथील आहे. पोलिसांच्या कारवाईत आरोपीच्या ताब्यात १२,९५० रुपये किंमतीचा २५९ ग्रॅम वजनाचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बाळगताना आढळून आला. हा अमली पदार्थ तो विक्रीसाठी वाहून नेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

या गुन्ह्याचा सविस्तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे करत आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------

#DighiPolice #DrugSeizure #Cannabis #Arrest #AntiNarcotics #PimpriChinchwad #IndrayaniRiver

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा