बुधवार, २१ मे, २०२५

पुण्यात भीषण अपघात: निष्पाप मुलाचा जीव गेला



 कोंढवा येथे कार चालकाची निष्काळजी; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

पुणे: १८ मे २०२५ रोजी कोंढवा बुद्रुक गावठाणातील भोलेनाथ चौकात एका १३ वर्षीय मुलाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारचालक जैद नसिर शेख (वय २३ वर्षे, रा. भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैद शेख त्याच्या इंनिव्हा गाडीतून काही लोकांना घेऊन जात होता. कोंढवा गावातील अरुंद रस्त्यावर त्याने वेगात गाडी चालवली आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. याच दरम्यान, रस्त्याच्या कडेने चाललेल्या १३ वर्षाच्या मुलाला त्याने जोरदार धडक दिली. मुलगा रस्त्यालगतच्या इमारतीच्या गेटमध्ये दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला आणि गेटही तुटून कार थेट पार्किंगमध्ये घुसली.

उपचारसाठी मुलाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कार चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४०१/२०२५, भा.द.वि. कलम १०६ (१), २८१, ३०४ (अ), मोटार वाहन कायदा ११९/१७७, १८४ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात करत आहेत.

अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि पोलीस अंमलदार जितू गायकवाड यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला.

---------------------------------------------------------------

#Pune #RoadAccident #Kondhwa #Police #Arrest #Tragedy #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा