गुरुवार, २२ मे, २०२५

तळेगाव दाभाडे येथे बनावट प्युमा उत्पादनांचा साठा जप्त, दुकान मालकांवर कारवाई

 


तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या सहा वेगवेगळ्या कपड्यांच्या दुकानांवर धाड टाकून बनावट प्युमा कंपनीचे उत्पादन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा दुकान मालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २० मे २०२५ रोजी सायंकाळनंतर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे फिल्ड ऑफिसर श्री अंकुर सिंह यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, तळेगाव दाभाडे येथील ब्राँड हबचे मालक अमर शाम चव्हाण (वय २९ वर्षे), छत्रपती मेन्स अटायरचे मालक प्रसाद नवनाथ कुल (वय २९ वर्षे), एच.पी. क्लोथ स्टोअरचे मालक हितेश उदयसिंग परदेशी (वय ३२ वर्षे), आउट लुक मेन्स वेअरचे मालक सौरव रोहीदार उबाळे (वय २५ वर्षे), जयश्री एन एक्सचे मालक हरिष मोतीराम देवासी (वय २५ वर्षे) आणि लिमीटेड अॅडीशन व सेंकन्ड स्किनचे मालक शशांक दिपक जैन (वय ३० वर्षे) हे त्यांच्या दुकानांमध्ये प्युमा कंपनीच्या मालकीच्या उत्पादनांचे विनापरवाना उत्पादन करत होते किंवा बनावट वस्तू तयार करून त्याची विक्री करत होते. ते ग्राहकांना हे बनावट उत्पादन प्युमा कंपनीचे मूळ उत्पादन असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करत होते.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सहा दुकानांवर छापा टाकला आणि बनावट प्युमा कंपनीचे उत्पादन जप्त केले. या प्रकरणी सर्व सहा दुकान मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि कोकाटे करत आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------

#CounterfeitGoods #Puma #TalegaonDabhade #PoliceRaid #FraudAlert #FakeProducts #BrandProtection

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा