नवी मुंबई: मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ६ च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे एका अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २४ कोटी ४२ लाख ८० हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रोन) आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ ६ मध्ये जानेवारी २०२५ पासून "नशा मुक्त गोवंडी अभियान" राबविण्यात येत आहे.
१९ मार्च २०२५ रोजी, हे पथक आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, एका व्यक्तीला ४५ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले.
तपासी पथकाने आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी कर्जतजवळील किकवी येथे ‘सावली फार्म हाऊस’ नावाचे ठिकाण असल्याची माहिती दिली.
"नशा मुक्त गोवंडी" अभियानांतर्गत परिमंडळ ६ मध्ये आतापर्यंत ४२ कोटी ७४ लाख ७१ हजार ८७३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त . देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर आयुक्त डॉ. महेश पाटील, उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक आयुक्त राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महादेव कुंभार, निरीक्षक समशेर तडवी, सहायक निरीक्षक मैत्रानंद विष्णू खंदारे, उपनिरीक्षक सुशांत साळवी, गणेश कर्चे, सहायक उपनिरीक्षक विजय वाणी, हवालदार पाटील, खैरे, शिपाई येळे, केदार, सानप, राउत, खटके, भावसार, घारे, चोरगे, सुतार, आणि कांबळे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०४:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: