खासदार श्रीरंग बारणेंची नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकाला भेट; विकासकामांचा घेतला आढावा

 


नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; खासदार बारणेंनी दिली माहिती

नेरळ/कर्जत, दि. २३ मे २०२५: मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकांना भेट देऊन तेथील विकासकामांचा आढावा घेतला. नेरळ रेल्वे स्थानकाचे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले सुधारणा काम आणि कर्जत रेल्वे स्थानकावरील सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नेरळ रेल्वे स्थानकावर दोन लिफ्ट, सरकते जिने, प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहे आणि स्थानकाचे सुशोभीकरण यांसारखी कामे सुरू आहेत. या कामांमुळे नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. त्यांनी पुणे विभागात येणाऱ्या रेल्वे स्थानकांना भेट दिल्यानंतर आता मुंबई विभागात येणाऱ्या कर्जत आणि नेरळ स्थानकांना भेट दिली.

या भेटीदरम्यान, खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी वरिष्ठ अभियंता नझीब जी, व्यवस्थापक अजय कुमार, पी. एम. प्रकाश, व्ही. जी. अल्लूरे, एस. के. यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषशेठ भोईर, शिवसेना तालुका प्रमुख सुदाम पवळी, भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, मनोहर थोरवे, माजी नगरसेवक संकेत भासे, माजी सभापती राहुल पिसे, शिवसेना नेरळ शहर प्रमुख किसन शिंदे, युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, सुरेश राणे, अंकुश दाभणे, दिलीप ताम्हाणे, रमेश मते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, नेरळ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे आणि प्रवासी संघटनांनीही या कामावर समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यात नेरळ स्थानक परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरते, त्यामुळे रेल्वे आणि ग्रामपंचायतीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसेच, विकास प्राधिकरणाला विश्वासात घेऊन स्ट्रॉम वॉटरची व्यवस्था करावी.

खासदार बारणे यांनी नेरळ ते कर्जत दरम्यान लोकल रेल्वेने प्रवास केला आणि कर्जत रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यांनी तेथील असुविधांची माहिती घेतली आणि त्या समस्या सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होत असल्याने कर्जत येथे नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. जुन्या स्थानकावरून एक्सप्रेस गाड्या धावतात, त्यामुळे या स्थानकाला आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली. भिसेगावला जोडणाऱ्या ओव्हर ब्रिजचे काम एमएमआरडीच्या माध्यमातून सुरू असून, त्याला गती देण्याची सूचना त्यांनी केली.

खासदार बारणे यांनी कर्जतपर्यंत लोकलमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

----------------------------------------------------------------------------------------------

#SrirangBarne #NerulRailway #KarjatRailway #RailwayDevelopment #MaharashtraNews #MPVisit #RailwayFacilities

खासदार श्रीरंग बारणेंची नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकाला भेट; विकासकामांचा घेतला आढावा खासदार श्रीरंग बारणेंची नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकाला भेट; विकासकामांचा घेतला आढावा Reviewed by ANN news network on ५/२४/२०२५ ०७:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".