चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ
पुणे : वंडरसिटी परिसरातील शिवराज हॉटेल जवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी झाल्याची घटना १८ मे रोजी घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी ५४ वर्षीय महिलेने (रा. कात्रज) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ती आपल्या पतीसोबत शिवराज हॉटेल, वंडरसिटी मुख्य गेटसमोरील रोडवरून चालत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून आल्या आणि फिर्यादीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #ChainSnatching #GoldTheft #WonderCity #Robbery #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: