उरण: २६ मे २०२५ रोजी झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे उरण तालुक्यात मोठे नुकसान झाले. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.
या वादळामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाली, घरातील सामानाची तोडफोड झाली आणि विद्युत उपकरणे खराब झाली. तसेच, काही नागरिकांना दुखापत झाली आणि कडधान्य वाया गेले. कळंबुसरे आणि सारडे गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, महेंद्रशेठ घरत यांनी कळंबुसरे आणि सारडे या गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्याला गती देण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांत आणि उरणचे तहसीलदार यांच्याशी फोनवर संपर्क साधला.
यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद भाई म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष उमेश भोईर, कळंबुसरे सरपंच उर्मिला नाईक, उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी उपसरपंच सारिका पाटील, काँग्रेस नेते भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, शिवसेना नेते निनाद नाईक, काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते महेश भोईर, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते डी. बी. भोईर, संकेत पाटील आणि मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#Maharashtra #Raigad #Uran #Cyclone #Damage #Relief #Congress
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०६:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: