सोमवार, २६ मे, २०२५

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भाजपतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भाजपतर्फे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पिंपळे सौदागर, जुनी सांगवी आणि काळेवाडी येथे ‘गंगा पूजन’ आणि ‘नदी घाट स्वच्छता अभियान’ राबवून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, संयोजक विजय उर्फ शीतल शिंदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, गोरक्षनाथ झोळ, मनोज ब्राह्मणकर, संजय भिसे, कुंदाताई भिसे, संदीप काटे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पिंपळे सौदागरमध्ये गंगा पूजन आणि स्वच्छता अभियान

पिंपळे सौदागर येथे महादेव मंदिरात महाआरतीनंतर गंगा पूजन आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर धर्म आणि समाजसेवेला महत्त्व दिले, अनेक मंदिरांची निर्मिती केली आणि नद्यांच्या घाटांचे बांधकाम व दुरुस्ती केली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

जुनी सांगवीत स्वच्छता अभियान

जुनी सांगवी येथे वेताळ महाराज मंदिर आणि विसर्जन घाटावर आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान पार पडले. यात नगरसेवक संतोष कांबळे, मंडळ उपाध्यक्ष युवराज ढोरे, चिटणीस हिरेन सोनवणे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काळेवाडीत स्वच्छता अभियान आणि पवनामाईची आरती

काळेवाडीत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन घाट स्वच्छता अभियान आणि पवनामाईची आरती करण्यात आली. या उपक्रमात ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रमोद ताम्हणकर, धर्माजी पवार, कैलास सानप, विठ्ठल भोईर, विनोद तापकीर आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

-------------------------------------------------------------------------------------------

 #AhilyadeviHolkar #PimpriChinchwad #BJP #SocialEvents #RiverCleaning #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा