शनिवार, ३१ मे, २०२५

पत्नी आणि प्रियकराने केला पतीचा खून

 


मुंबईत खुनाचा गंभीर गुन्हा ४ तासात उघडकीस

मुंबई : २६ मे २०२५ रोजी पहाटे ३:०० वाजता अँटॉप हिलमधील राजीव गांधी नगर झोपडपट्टी परिसरात एका व्यक्तीचा खून झाला होता आणि पोलिसांनीया गुन्ह्याची उकल केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव इस्माईल अली शेख, वय ३७ वर्षे, असून त्याची पत्नी सुमय्या इस्माईल अली शेख, वय २६ वर्षे, आणि तिचा प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख, वय २७ वर्षे, यांनी मिळून खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी निजाम अख्तार शेख, वय ३८ वर्षे, यांच्या तक्रारीवरून अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.क्र. २२१/२०२५, कलम ३०२ भा.द.वि. अन्वये नोंदणी करण्यात आली आहे.

पोलिसांनी संशय आल्यावरून सुमय्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने प्रियकर सकलाईनच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की आरोपी मिरा दातार दर्गा परिसरातील झोपडपट्टीत राहत आहे. पोलिसांनी मिरा दातार परिसरात जाऊन आरोपीचा फोटो दाखवून त्याच्या राहत्या पत्त्याची खात्री केली. आरोपीला पकडण्यासाठी गेले असता, त्याने रेल्वे पटरीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, दोघांमध्ये अनैतिक संबंध होते आणि मयत इस्माईल हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांनी खून केल्याची कबुली दिली. दोघांनी मिळून मृतदेह गॅलरीत ठेवला होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त श्री. गणेश गावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेंद्र थिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, समीर कांबळे, स.पो.नि. सतीश कांबळे, शिवाजी मदने, प्रदिप पाटील, आण्णासाहेब कदम, पो.उप.नि. शैलेश शिंदे, निलेश राजपूत, सरोजिनी इंगळे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#Mumbai #Crime #Murder #Police #Maharashtra #AntopHill #Investigation

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा