सोमवार, १९ मे, २०२५

खेड-तळे मार्गावर भीषण अपघात

 


दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर

खेड, दि. १९: खेड तालुक्यातील खेड-तळे रस्त्यावर कुडोशी गावाजवळ आज (रविवार, १८ मे २०२५) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. खेडकडून देवघरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच १४ जीएफ ८९२७) ची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला समोरासमोर जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघातामुळे खेड-तळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

---------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा