१ जून २०२५ रोजी पुणे शहरात वाहतूक मार्गात बदल
पुणे: पुणे शहरात दिनांक १ जून, २०२५ रोजी वृक्षाथॉन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
हे मॅरेथॉन पुणे शहर पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथून सुरू होऊन विर चाफेकर चौक, सुर्यमुखी दत्त मंदिर चौक, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, सी. पी. आर. शाळा चौक, पंचवटी चौक, ए. आर. डी. ए. पाषाण, पाषाण सर्कल चौक, नेकलेस गार्डन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एच. एम. ई. आर. एल. चौक, बावधन पोलीस चौकी, डी. पॅलेस चौक, शिंदे पेट्रोल पंप, चांदणी चौक आणि त्याच मार्गाने परत पुणे शहर पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे समाप्त होणार आहे.
या मॅरेथॉनदरम्यान वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या अधिसूचनेनुसार आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत, असे प्रभारी पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले आहे.
वाहतुकीतील मुख्य बदल:
शिवाजीनगरकडून चतुःशृंगीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. यासाठी सिमला चौक, संचेती चौक, जी. एम. रोड हे पर्यायी मार्ग असतील.एफ. सी. रोडने येणाऱ्या वाहनांसाठी संत ज्ञानेश्वर पादुका चौक, एकबोटे चौक, ललित महल चौक मार्गे मार्ग ठेवण्यात आले आहेत.नर्गिस दत्त लेन आणि एल. आय. सी. लेन तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.चांदणी चौकातून पाषाणकडे जाणारी वाहतूक सकाळी ४:०० ते १०:०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.पाषाण गावातून अभिमानश्री पाषाणकडे येणारी वाहतूक बाजीराव चौक, पाषाण सुस रोडने वळवण्यात येईल.याव्यतिरिक्त, शहरातील विविध भागांतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मॉडर्न चौक, रेंजहिल्स कॉर्नर, नळ स्टॉप चौक, औंध गाव, आणि बाणेर फाटा येथील मार्गांचा समावेश आहे.
या मॅरेथॉन मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ४:०० ते १०:०० वाजेपर्यंत नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोन घोषित करण्यात आला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
#PuneTraffic #Marathon #TrafficDiversion #PunePolice #Vrukshathon #वाहतूक #पुणे #पोलीस #मॅरेथॉन
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२५ ०४:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: