रविवार, २५ मे, २०२५

पिंपळे सौदागरमध्ये ऑनलाईन फसवणूक, क्रेडिट कार्डावरील रिवॉर्ड पॉइंटच्या नावे ६५ हजारांचा गंडा

 


पुणे, २५ मे २०२५: पिंपळे सौदागर येथील लव्हिडालॉका सोसायटीत राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीची अॅक्सिस बँकेच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करून ६५,००० रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही.

१ मे २०२५ रोजी दुपारी १२:३६ वाजता फिर्यादी (वय ३७ वर्षे, धंदा: नोकरी, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांना मोबाइल क्रमांक ७६२८९०३२२३ वरून एका अनोळखी महिलेने कॉल केला. तिने स्वत:ला अॅक्सिस बँकेची कर्मचारी म्हणवून फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड बिलावर रिवॉर्ड पॉइंट्सद्वारे डिस्काउंट देण्याचे आमिष दाखवले आणि तिचा सहकारी पुन्हा कॉल करेल असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर दुसऱ्या मोबाइल क्रमांक ६९०९१४७८९० वरून एका अनोळखी पुरुषाने कॉल करून अॅक्सिस बँकेच्या नावाने तेच आमिष दाखवले. त्याने https://getrewardpoints.in/axis-bank/ हे लिंक फिर्यादीच्या मोबाइलवर पाठवले. या लिंकद्वारे फिर्यादीची ६५,००० रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली.

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनसोडे करत आहेत.

-----------------------------------------------------------------------------

 #Pune #CyberFraud #OnlineScam #CreditCardFraud #FinancialFraud #SangviPolice #Maharashtra #CrimeNews #DigitalFraud #AxisBank #BewareOfScams

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा