विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : शेअर मार्केटमध्ये इंडेक्स ट्रेडिंगमधून भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ३२ वर्षीय तरुणीची २२ लाख ६७ हजार ३२८ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून १० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन माध्यमाद्वारे फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये इंडेक्स ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र कोणताही नफा न देता फिर्यादीच्या २२,६७,३२८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे करीत आहेत.
------------------------------------------
#PunePolice #OnlineFraud #InvestmentScam #CyberCrime #FinancialFraud #ShareMarketScam

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: