पुणे: शरद मोहोळ खून प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी पिस्तूल आणि काडतुसांसह जेरबंद
पुणे: गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पोलिसांनी शरद मोहोळ खून प्रकरणात पाहिजे असलेल्या एका आरोपीला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. १९/०५/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.आरोपी ओंकार सचिन मोरे (वय २३ वर्ष, रा. मुठा कॉलनी, पुणे) याने गुंड शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचला होता. या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३/२०२५ बी.एन.एस. १११, ६१ (ब) आर्म अॅक्ट ३ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी ओंकार मोरे याला चारनळ सुतारदरा, कोथरूड, पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४०,८०० रुपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२५ आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अतिरिक्त कार्यभार श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण आणि नागेश राख यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
--------------------------------------------------------------------
#Pune #Crime #Arrest #Murder #ArmsAct #PunePolice #CrimeBranch #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२५ ०३:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: