तीन पीडित महिलांची सुटका
ठाणे: ठाणे पोलिसांनी कल्याण-भिवंडी रोडवरील एका रेस्टॉरंटमधून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, AHTC च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना माहिती मिळाली होती की, एक महिला दलाल "राधा कृष्णा रेस्टॉरंट, पारो बार समोर, कल्याण-भिवंडी रोड, राजनोली गाव, तालुका भिवंडी" येथे काही असहाय्य महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, AHTC ठाणे शहर शाखेने १६ मे २०२५ रोजी सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्या तावडीतून १६ वर्षे ९ महिने वयाची एक अल्पवयीन मुलगी आणि ३ पीडित महिलांची सुटका केली.
आरोपी महिलेविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, फरार असलेल्या आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सुटका केलेल्या महिलांना सुरक्षिततेसाठी उल्हासनगर येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) धनाजी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-------------------------------------------------------------------
#Thane #Arrest #Prostitution #Human Trafficking #Crime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा