गुरुवार, २९ मे, २०२५

पुणे पोलिसांनी कोंढव्यात पकडले लाखो रुपयांचे अंमली पदार्थ; एकाला अटक

 


लाखो रुपयांचे अफिम आणि डोडा चुरा जप्त; पुणे पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे, दि. २८ (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून ५ लाख १३ हजार १६० रुपये किमतीचे २५६ ग्रॅम ५८ मिलीग्राम अफिम आणि २५ हजार ९२० रुपये किमतीचे १ किलो ७२८ ग्रॅम अफिमची बोंडांची पावडर (पॉपी स्ट्रॉ) आणि डोडा चुरा जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन सुखराम काला (वय ३१ वर्षे, रा. शिक्षक नगर, गल्ली नं ०२, फ्लॅट नं २०३, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, पुणे) याला यश कॉम्प्लेक्स समोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, कोंढवा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर (अतिरिक्त कार्यभार गुन्हे) श्री. संजय पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे आणि सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर कोकाटे आणि पोलीस अंमलदार संदिप शिर्के, विशाल दळवी, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुन गायकवाड आणि स्वप्नील मिसाळ यांच्या पथकाने केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------

  • #PunePolice
  • #NarcoticsSeizure
  • #DrugBust
  • #Opium
  • #PoppyStraw
  • #DodhaChura
  • #Kondhwa
  • #CrimeBranch
  • #DrugCrime

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा