गुरुवार, २९ मे, २०२५

चौंडीत अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळासाठी ६८१ कोटींचा विकास प्रकल्प मंजूर

 


अहिल्यानगर, दि. २९ (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चौंडी, ता. जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनाने ६८१.३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची 'संनियंत्रण अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या आराखड्यांतर्गत प्रस्तावित कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात विविध विकास कामे आणि सुविधांचा समावेश आहे, ज्यात वास्तूतज्ञांची नियुक्ती, अस्तित्वातील वास्तूंचे जतन व संवर्धन, रस्ते बांधकाम, नदी घाट बांधकाम, प्रदर्शन केंद्र उभारणे, बगीचा, जलव्यवस्थापन, विद्युत कामे, अग्निशमन यंत्रणा, आणि इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे.

या प्रकल्पासाठी निधी नियोजन विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याचे व्यवस्थापन केले जाईल. कामांमध्ये कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि सर्व कामे विहित वेळेत पूर्ण होतील याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

या विकास आराखड्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती स्थळाचे जतन आणि संवर्धन होऊन परिसरातील सुविधा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • -------------------------------------------------------------------------------------------
  • #AhilyadeviHolkar
  • #Chondi
  • #MaharashtraTourism
  • #Heritage
  • #DevelopmentProject
  • #Ahmadiynagar
  • #IndianHistory

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा