पुणे: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी मादक पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई करत तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई २४ मे २०२५ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास पाषाण-सूस रोडवरील कल्याणी कलेक्शन नावाच्या दुकानाच्या तळघरात आणि हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या बालाजी निवास या घरात करण्यात आली.
याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार जावेद रफिक बागसिराज (बक्कल क्रमांक १२२२) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिषेक विकास रानवडे (वय ३२ वर्षे, रा. बालाजी निवास, हनुमान मंदिराच्या बाजूला, पाषाण-सूस रोड, पुणे; मूळ रा. दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे ३०), उमेश सूर्यकांत देशपांडे (वय ५६ वर्षे, रा. शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ७, पाषाण-सूस रोड, पुणे) आणि एका २२ वर्षीय महिला (रा. बालाजी निवास, हनुमान मंदिराच्या बाजूला, पाषाण-सूस रोड, पुणे; मूळ रा. दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे ३०) समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींच्या ताब्यातून एकूण ११ लाख ५ हजार ४५० रुपये किमतीचा २० किलो २९५ ग्रॅम गांजा, ३ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी सदर मादक पदार्थ विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळले.
बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाषाण-सूस रोडवरील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या बालाजी निवास नावाच्या घरातून पोलिसांनी २२ हजार २५० रुपये किमतीचा ४४१ ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा तिसरी महिला आरोपी विक्री करत होती. पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली असता, तिने हा गांजा अभिषेक रानवडे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२५, एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर करत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------
#BawdhanPolice #DrugBust #CannabisSeizure #NDPSAct #DrugTrafficking

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: