६.२० लाख रुपयांचे दागिने चोरले
हडपसर (पुणे): मांजरी बुद्रुक येथील साईराम नगरात मोठी घरफोडी करण्याचा प्रकार घडला आहे. २६ मे रोजी रात्री १० वाजत्यापासून २७ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी ५७ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून ६,२०,००० रुपयांचे नुकसान केले आहे.
ढेरे बंगला समोरील गोपाळपट्टी भागातील या घटनेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. त्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०२/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------- #HouseBreaking #HadapsarCrime #JewelryTheft #Burglary #PropertyCrime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा