पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील बौद्धनगर परिसरात पाईप चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. २४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १६ नंबर बिल्डिंगसमोर ही घटना घडली. चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने आरोपीने तक्रारदाराला मारहाण देखील केली.
या प्रकरणी राहूल धोंडूराम दणके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी क्रिश हजारे (वय १९ वर्षे, रा. बौद्धनगर, पिंपरी, पुणे) याने त्यांच्या चुलत भावाच्या गोदामातून लोखंडी पाईप चोरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रिश हजारे गोदामातून पाईप काढत असताना फिर्यादी राहूल दणके यांनी त्याला पाहिले आणि याबाबत त्यांचे चुलते धोंडूराम दणके यांना माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या क्रिश हजारे याने राहूल दणके यांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्याने सिमेंटच्या गट्टूने राहूल दणके यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारून त्यांना जखमी केले.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सरडे (बक्कल क्रमांक २९०१) यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
---------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwad #PipeTheft #Crime #PoliceAction #Arrest
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०९:१०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: