पुणे: वाघोली परिसरातून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुरेश राममुर्ती बोयर (वय २५, रा. उदईराज पलयम थोट्टातल्लम, ता. आंबूर, वेल्लूर, राज्य तमिळनाडू) याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १०/०५/२०२५ रोजी वाघोली येथील बिमला निवास, रॉयल पार्क येथून २ लॅपटॉप आणि ३ मोबाईल चोरी झाले होते.
गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस अंमलदार दिपक कोकरे आणि पांडुरंग माने यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण केले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, श्री. युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, बाबासाहेब मोराळे, समीर माटे, दिपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, समीर भोरडे, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण यांच्या पथकाने केली.
--------------------------------------------------
#Pune #Wagholi #Theft #Crime #PunePolice #Arrest #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०५:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: