मुंबई | प्रतिनिधी : आज दिनांक २३ मे २०२५ रोजी मुंबईतील दादर येथील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोकण विभागातील काँग्रेस नेते, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, तालुका व शहर अध्यक्ष तसेच लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे सहप्रभारी मा. श्री. यु. बी. व्यंकटेश प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली. काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भूमिका, पक्ष संघटना बळकट करणे, व पक्षवाढीसाठी सकारात्मक दिशा निश्चित करण्यात आली.
ठाणे ग्रामीण व अंबरनाथ काँग्रेसचा आढावा सादर
ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. दयानंद चोरघे यांनी आपल्या जिल्ह्याचा सविस्तर आढावा बैठकीत सादर केला. त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली की, “ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर असेल.”
अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. कृष्णा रसाळ - पाटील यांनी अंबरनाथ शहर काँग्रेसचे कामकाज, स्थानिक प्रश्न व संघटनात्मक स्थिती यावर भाष्य करताना महाविकास आघाडी संदर्भात स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी की आघाडी करावी, यावर स्पष्ट चर्चा घडवून आणली.
या बैठकीमध्ये कोकण विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा सादर केला आणि आगामी निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा