शनिवार, ३१ मे, २०२५

मुंबई वाहतूक पोलिसांकडून कोस्टल रोडवर वाहतूक बदलाची अधिसूचना

 


मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (कोस्टल रोड) वरील वाहतुकीत काही तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल ३० मे २०२५ पासून लागू होणार आहेत.

कोस्टल रोड हा जलद वाहतुकीसाठी बांधण्यात आला असून, तो २६ जानेवारी २०२५ पासून मरीन ड्राईव्ह, वत्सलाबाई देसाई चौक आणि सी लिंक टोल प्लाझापर्यंत खुला करण्यात आला आहे. जे. के. कपूर चौकातून सुरू होणाऱ्या अंडरपास/सबवेचे काम पूर्ण झाले असून, तो खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आला आहे.

या बदलांनुसार, जे. के. कपूर चौकातून सुरू होणारा अंडरपास/सबवे ३० मे २०२५ पासून दररोज सकाळी ७:०० ते रात्री १२:०० पर्यंत चारचाकी आणि प्रवासी बससाठी खुला राहील. रात्री १२:०१ ते सकाळी ७:०० पर्यंत तो वाहतुकीसाठी बंद असेल. या मार्गावर दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश असणार नाही.

वाहनांसाठी वेगाची मर्यादा ४० कि.मी. प्रति तास निश्चित करण्यात आली आहे. हे आदेश ३० मे २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहतील, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #Mumbai #Traffic #CoastalRoad #TrafficRules #Maharashtra #MumbaiTraffic

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा