पुणे, दि. २० मे २०२५: वडगावशेरी परिसरात एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरात पेस्ट कंट्रोल करण्याच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी तब्बल २ लाख ४७ हजार १२० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे २०२५ ते १९ मे २०२५ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या वेळेत वडगावशेरी येथील प्लॉट नंबर ९६, सर्व्हे नंबर ०१ येथे घडली. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक (वय ७९ वर्षे) यांच्या घरी चार अनोळखी व्यक्ती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आले होते. या संधीचा फायदा घेत त्यांनी फिर्यादीची नजर चुकवून ८० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २ लाख ४७ हजार १२० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घडलेल्या प्रकारानंतर ज्येष्ठ नागरिकाने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक असवले करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #Theft #HouseBurglary #VadgaonSheri #PestControlScam #SeniorCitizenSafety #ChandanNagarPolice #IndianJusticeCode #PuneNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा