पुणे: चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करताना एका तरुणास अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अभिजीत लहू तुरुकमारे (वय २४ वर्षे, रा. कॉलनी नं. १, पंतनगर, सेक्टर नं. १६, जाधव वाडी, चिखली, पुणे) यास २२ मे रोजी संध्याकाळी ७.५० वाजता चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील बेलगाडा घाट, पाण्याच्या टाकीजवळ अटक करण्यात आली.
अटक झालेल्या आरोपीकडून ३२,९०० रुपयांचा ६५८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा अमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करीत होता.
चिखली पोलीस ठाण्यात NDPS अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------
#DrugTrafficking #ChikhaliArrest #CannabisSeizure #NDPSCase #YouthArrest
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा