गुरुवार, २२ मे, २०२५

कोथरूड येथे भीषण अपघात; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

 


सीसीटीव्ही फुटेज तपासात निर्णायक ठरणार

पुणे : कोथरूड येथे शांतीबन चौक ते आशीष गार्डन चौक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मे २०२५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास शांतीबन चौक ते आशीष गार्डन चौक दरम्यान जाणाऱ्या डी.पी. रोडवर ही घटना घडली. प्रियंका पानसे (वय ४४, रा. कोथरूड) या आपल्या १२ वर्षीय मुलासह मोटारसायकलवरून जात असताना एका कार चालकाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियंका यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात गाडी चालवल्याने हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------

#PuneRoadAccident #RoadSafety #KothrudAccident #TrafficViolation #NegligentDriving #PunePolice

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा