उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक

 


खरीप हंगाम आणि शेती प्रक्रिया संदर्भात शेतकऱ्यांना शासनातर्फे मार्गदर्शन

उरण : पंचायत समिती सभागृह, उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, गटविकास अधिकारी उरण समीर वाठारकर, नायब तहसीलदार उरण महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी उरण अर्चना सुळ, श्री. वणवे (शास्त्रज्ञ, खारभूमी संशोधन केंद्र, पनवेल), मंडळ कृषी अधिकारी उरण एस. डी. गटकळ, कृषी पर्यवेक्षक बी. वाय. धेंडे, एस. व्ही. लोहकरे, श्रीमती ए. डी. बुरकुल यांच्यासह उरण तालुक्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी आणि इतर शेतकरी, तसेच पीएमएफएमई मधील महिला व्यावसायिक, महिला बचत गट आणि कृषी सेवा केंद्र धारक, पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान व एफपीओचे सदस्य असे एकूण ११५ शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उरण तालुक्याच्या कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी खरीप हंगाम २०२५ सभेचे सादरीकरण आणि नियोजन सादर केले. आमदार महेश बालदी यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी ऐकून घेत मार्गदर्शन केले. प्रकाश ठाकूर (वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार विजेते) आणि प्रफुल्ल खारपाटील (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते) यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आपले विचार व्यक्त केले.

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी आणि भात पिकांचे विविध वाण यांबद्दल प्रदर्शन व सखोल माहिती देण्यात आली. उरण तालुक्याच्या कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी आभार प्रदर्शन केले.

---------------------------------------------------------------------------------------------


उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक Reviewed by ANN news network on ५/२४/२०२५ ०९:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".