पाटील यांच्या पदभार स्वीकार समारंभाला कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, कोल्हापूर युनिटचे मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे प्रमुख संतोष साखरे आणि सातारा कार्यालयाचे मुख्य शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी उपस्थित होते. या मान्यवरांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हणमंत पाटील यांनी यापूर्वी लोकमत पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे ब्युरो चिफ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. अभ्यासू आणि मितभाषी पत्रकार अशी त्यांची वृत्तजगतात ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमत सातारा आवृत्तीची वाटचाल अधिक यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
............................................
#Lokmat
#SataraNews
#MediaAppointment
#HanmantPatil
#MarathiJournalism
#MediaLeadership
#NewsEditor
#MarathiNewspaper
#MediaIndustry
#RegionalJournalism
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२५ १२:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: