पुणे, २५ मे २०२५: देहुरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तळवडे येथील पुणे कार्बन प्रा. लि. या कंपनीतून ७४,७११ रुपये किमतीचे तांबे आणि टंगस्टन कार्बाईनचे मटेरियल चोरणाऱ्या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव मोहसिन आत्तार (रा. विकासनगर, किवळे, ता. हवेली, पुणे) असे आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
४ मे २०२५ ते ६ मे २०२५ या कालावधीत सकाळी ८:३० ते सायंकाळी ९:०० या वेळेत ही चोरी झाली. फिर्यादी सुरिंदरपालसिंग चरणजितसिंग गुलाटी (वय ७५ वर्षे, रा. बाणेर, पुणे) यांच्या कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या मोहसिन आत्तार याने अप्रामाणिकपणे आणि लबाडीच्या उद्देशाने कंपनीतील तांबे आणि टंगस्टन कार्बाईनचे मटेरियल वारंवार चोरले. ही बाब फिर्यादी गुलाटी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २४ मे २०२५ रोजी देहुरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
------------------------------------------------------------------------
#Pune #Theft #IndustrialTheft #DehuRoadPolice #EmployeeTheft #CopperTheft #TungstenCarbide #CrimeNews #PuneCrime #CompanyTheft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: