पुणे: हडपसरमधील मगरपट्टा येथे एका निवासी इमारतीत १७ मे रोजी रात्री घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून २३ लाख ४३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय फिर्यादी १७ मे रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरात झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला आणि लोखंडी तिजोरी तोडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली.
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींचा शोध घेत आहेत.
------------------------------------------------------------------------------------
#Pune #Crime #Theft #Burglary #Magarpatta #Hadapsar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: