शनिवार, ३१ मे, २०२५

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

 


धाराशिव: वाशी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका लिपिकावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर मारोतराव ढोले, वय ४५ वर्षे, असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. ते उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ढोले यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी ३०००/- रुपयांची लाच मागितली होती. पंचांसमक्ष तडजोड झाल्यानंतर २०००/- रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.र.नं. १८७/२०२५, कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये नोंद झाली आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास राठोड करत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------- #Dharashiv #Corruption #Bribery #Maharashtra #ACB #LandRecords

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा